हद्दपारीची कारवाई करण्यात आलेले नदीम शेख व हादी खान pudhari photo
सिंधुदुर्ग

कुडाळ तालुक्यातील दोघांची जिल्ह्यातून हद्दपारी!

एकावर नायब तहसीलदारांच्या अंगावर डंपर घातल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे -मुस्लिमवाडी येथील नदीम अब्दुल रेहमान शेख (24, सध्या रा. पिंगुळी-गुढीपूर, शिक्षक कॉलनी) व हादी अब्दुल बारी खान (35, संध्या रा. आंबेडकर नगर, कुडाळ, मूळ बलरापूर-उ. प्र.) या दोघांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी दिले, अशी माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

कुडाळ पोलिस स्थानक येथे श्री. मगदूम यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. मगदूम म्हणाले, नदीम शेख याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. कुडाळ पोलिस स्थानक रेकॉर्डवर नदीम शेख यांच्यावर विनयभंग, चोरी, घरफोडी, शासकीय अधिकार्‍यास ठार मारण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे जवळपास 8 गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा दाखल करण्याच्या वेळी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्याच्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्याच्या वर्तणूकीत सुधारणा न झाल्याने कुडाळ पोलिसांनी 25 जुलै 2024 रोजी प्रांताधिकार्‍यांनी सदर अभिलेखा वरील आरोपीचा गुन्हे अभिलेख पडताळून व गोपनीय साक्षीदार यांच्या जबाबाचे अवलोकन करून त्याला 2 वर्षाकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. नदीम शेख हा सध्या सावंतवाडी कारागृहात बंद आहे. तो जामिनावर बाहेर येताच सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नदिम शेख याने 18 जानेवारी 2025 रोजी कुडाळचे नायाब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला होता. त्या गुन्ह्यातच तो न्यायालयीन कोठडीत सावंतवाडी जेलमध्ये आहे.

हद्दपारीची कारवाई झालेला दुसरा संशयित हादी अब्दुल बारी खान (35, संध्या रा. आंबेडकर नगर, कुडाळ) हा उत्तर प्रदेश राज्यातील बलरामपूरचा रहिवासी आहे. त्याच्यावर गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत. सन 2022 मध्ये जीवे ठार मारण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. याच्या सुनावणीत तो न्यायालयात तारखांना हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट काढले होते. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली असुन सद्या तो सावंतवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्यालाही कुडाळ प्रांताधिकार्‍यांनी जिल्ह्यातून 2 वर्षे तडीपारचे आदेश दिले आहेत. तर कुडाळ पोलीसांनी सादर हद्दपारीचे तीन प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे अद्याप प्रलंबित असल्याचे श्री. मगदूम म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT