कुडाळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस  
सिंधुदुर्ग

Sindhudurg Rain : कुडाळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस

कापणी केलेले भात भिजल्याने शेतकरी चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा उकाडा आणि उन्हाचा चटका यानंतर सोमवारी दुपारी कुडाळ तालुक्यात हवामानात अचानक बदल झाला. आकाशात ढगांची गर्दी होऊन दुपारी ३ वा.च्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला; मात्र भातकापणी हंगामात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कापणी करून शेतात वाळत घातलेले भात भिजल्याने पिकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या झेंडूच्या फुलांनाही पावसाचा फटका बसला.

सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. छत्री, रेनकोट शिवाय घराबाहेर पडलेल्या नागरिक व दुचाकीधारकांची त्रेधातिरपीट उडाली. वीज व इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली होती.

झेंडू विक्रेत्यांची धावपळ

दसऱ्यानिमित्त कुडाळ बाजारपेठेत झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. सणासाठी फुले खरेदी करण्याकरिता ग्राहक बाजारपेठेत येत असतानाच अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विक्रेत्यांना झेंडूची फुले प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावी लागली. पावसामुळे फुलांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने विक्रेत्यांची धावपळ उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT