कुडाळ : जि. प. ,पं. स. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी 14 जणांनी अर्ज घेतले. मात्र, एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. अर्ज खरेदी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्यांने अपक्ष उमेदवारांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.
कुडाळ तहसील कार्यालयातून जि. प. साठी 5 व पं. स. साठी 9 अशा एकूण 14 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. यात माणगाव जि.प. गटासाठी सदाशिव परशुराम आळवे (अपक्ष), ओरोस बुद्रुक- रामदास गोपाळ ठाकूर (अपक्ष), नेरूर देऊळवाडा - बाळकृष्ण गुरूनाथ पावसकर (अपक्ष), पावशी - मंदार सखाराम कोठावळे (अपक्ष) व वेताळबांबर्डे -अनंतराज नंदकिशोर पाटकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांनी अर्ज विकत घेतले.
झाराप पं.स.-सदाशिव आळवे (अपक्ष), पिंगुळी- कश्मिरा केतन शिरोडकर यांच्यासाठी केतन विजय शिरोडकर (अपक्ष), डिगस-विनायक जनार्दन अणावकर (शिंदे शिवसेना), डिगस-विनायक जनार्दन अणावकर (अपक्ष), कसाल-चंद्रकांत अनंत राणे (शिंदे शिवसेना 2 अर्ज), आंब्रड-अंकित विनायक नार्वेकर (शिंदे शिवसेना), डिगस मंदार सखाराम कोठावळे (अपक्ष), ओरोस बुद्रुक-अनंतराज नंदकिशोर पाटकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांनी अर्ज विकत घेतल्याची माहीती तहसील कार्यालयातून देण्यात आली. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुट्टीचे दिवस वगळून बुधवार, 21 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.