रिक्षा चालकाकडून युवतीला जबरदस्ती खेचण्याचा प्रयत्न File Photo
सिंधुदुर्ग

Girl Harassment | रिक्षा चालकाकडून युवतीला जबरदस्ती खेचण्याचा प्रयत्न

कुडाळ शहरातील प्रकार; रिक्षा चालक फरार

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ शहरात एका रिक्षाचालकाकडून युवतीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्या अज्ञात रिक्षाचालकाचा शोध सुरू केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. दरम्यान, संबंधित युवतीने याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.

ही युवती कुडाळ शहरातील एका खासगी रुग्णालयात कामाला आहे. सायंकाळी काम संपवून ती घरी परतत असताना एका अनोळखी रिक्षाचालकाने तिच्यासमोर रिक्षा थांबवली. काही समजायच्या आत त्या रिक्षाचालकाने युवतीचा हात पकडून तिला जबरदस्तीने रिक्षामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे युवती क्षणभर घाबरली, मात्र तिने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला.

तिच्या आरडाओरड्याने आसपासचे लोक त्या ठिकाणी जमा होऊ लागल्याचे पाहून रिक्षाचालकाने ताबडतोब रिक्षासह पळ काढला. या दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रिक्षा स्पष्टपणे दिसत असली तरी चालकाचा चेहरा नीट ओळखता येत नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. पोलिसांकडून याचा कसून शोध सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुडाळसारख्या गजबजलेल्या शहरात अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT