कुडाळ : या रिक्षामधून प्रवास करणारे नर्सिंगचे सहा विद्यार्थी व रिक्षा चालकाचा मित्र असे सात जण जखमी झाले. जखमींवर कुडाळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. हा अपघात सोमवारी सायंकाळी 5.15 वा.च्या सुमारास झाला.
दरम्यान दोन विद्यार्थ्यांसह गंभीर दुखापत झालेल्या रिक्षा चालकाचा मित्राला कुडाळ येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर रिक्षा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
या रिक्षामधून नर्सिंग स्कूलच्या पाच विद्यार्थीनी, एक विद्यार्थी तसेच रिक्षा चालकाचा मित्र असे प्रवास करत होते. दरम्यानच्या वेळी रिक्षावरील चालकाचा ताबा सुटला आणि रिक्षा तेथील वळणावर पलटी झाली. यावेळी रिक्षामधील विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
यातील दोन विद्यार्थ्यांसह रिक्षामधील अन्य एकाला जास्त दुखापत झाल्याने तिघांनाही अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघातानंतर रिक्षा चालकाने तेथून पळ काढल्याचे समजते. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती तसेच ग्रामीण रूग्णालयात भेट देऊन जखमींचा जबाब घेत पुढील कार्यवाही सुरू केली होती.