नांदगाव : श्री कृष्णाच्या हातात बासरी आणि डोक्यावर मोरपीस धारण केलेले रूप सर्वांनाच भाळते. श्रीकृष्णाचे जन्मोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे जांभूळवाडी येथील चित्रकार शिवाजी डोईफोडे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मध्यरात्री मोरपिसावर श्रीकृष्णाचे चित्र काढून आपली कला दाखवली.
धार्मिक मान्यतेनुसार एकदा राधा श्रीकृष्णाच्या बासरीवर नाचत असताना तिच्या सोबत मोरही नाचू लागले. तेव्हा त्यातील एक मोरपंख खाली पडले. तेव्हा श्रीकृष्णाने ते मुकूटावर सजवले. मोराच्या पिसांना राधेच्या प्रेमाचे प्रतीक मानत होते. म्हणूनच श्रीकृष्णाच्या माथ्यावर मोरपीस पाहायला मिळते, अशी अख्यायिका आहे. चित्रकार शिवाजी डोईफोडे यांनी साकारलेल्या या चित्राचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.