सिंधुदुर्ग : पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावरील नैसर्गिक संकटांचा उद्भवणारा धोका लक्षात घेऊन ‘कोरे’ प्रशासनाने दरवर्षी पावसाळी वेळापत्रक जाहीर करते. या कालावधीत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांचा वेग कमी करण्यात येते. यावर्षी कोकण रेल्वे प्रशासनाने १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मान्सून वेळापत्रक जाहीर केले आहे, मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याया धोका लक्षात घेता, गाड्यांचा वेग मर्यादित केला जाणार आहे. वेग मंदावणार असल्याने प्रवाशांना विलंबाचा फटका बसू नये, म्हणून अनेक महत्याच्या गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.
गाड्यांचा वेग कमी झाल्याने प्रवासाची वेळ १ ते ३ तासांनी वाढणार आहे. प्रमुख गाड्यांचा सविस्तर तपशील आणि बदललेल्या वेळापत्रकाची माहिती पुढीलप्रमाणे :
मांडवी एक्सप्रेस (१०१०३/१०१०४): मुंबई- मडगाव मांडवी एक्सप्रेस (१०१०३) वैभववाडी रोड स्थानकावर दु.४.५६ वा., कणकवली सायं. ०५.३० वा., सिंधुदुर्ग सायं. ६ वा., कुडाळ सायं.६.१४ वा. आणि सावंतवाडी रोड सायं. ७ वा. येईल. परतीच्या प्रवासात मडगाव-मुंबई CSMT मांडवी एक्सप्रेस (१०१०४) सावंतवाडी रोड स्थानकावर स.१०.२ वा., कुडाळ १०.२२ वा., सिंधुदुर्ग १०.३८ वा., कणकवली ११ वा. आणि वैभववाडी रोड स. ११.३० वा. येईल.
कोकणकन्या एक्सप्रेस (२०१११/२०११२): कोकणकन्या एक्सप्रेस (२०१११) मुंबईहून नेहमीप्रमाणे रात्री ११.०२ वाजता सुटेल. वेग मयदिमुळे ही गाडी वैभववाडी स्थानकावर स. ७.२० वा., कणकवली-७.५४ वा., सिंधुदुर्ग येथे ८.१० वा.कुडा ८.२४ वा., सावंतवाडी रोड ८.४६ वा. येईल. परतीच्या प्रवासात कोकणकन्या एक्स्प्रेस (२०११२) मडगावहून दुपारी ४ वा. सुटेल. ही गाडी सावंतवाडीत सायं. ७.३० वा., कुडा ७.५२ वा., सिंधुदुर्ग रात्री ८.०४ वा., कणकवली ८.२४ वा. तर वैभववाडी ८.५६ वा. येईल.
तुतारी एक्सप्रेस (११००३/११००४) : दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस (११००३) दादरहून रात्री १२.५ वा. सुटेल. ती वैभववाडीत सकाळी ९.४८ वा., नांदगाव १०.१० वा., कणकवली १०.३० वा., सिंधुदुर्ग ११ वा., कुडाळ ११.१२ वा., सावंतवाडी रोड दुपारी १२.४० वा. पोहोचेल. परतीची तुतारी एक्सप्रेस (११००४) सावंतवाडी रोड स्थानकावरून सायंकाळी ५.५५ वा. सुटेल. ही गाडी कुडाळ ६.१४ वा., सिंधुदुर्ग ६.२६ वा., कणकवली ०६.४६ वा., नांदगाव ७.०६ वा., वैभववाडी ७.२२ वा. मुंबईसाठी रवाना होईल.
वंदे भारत एक्सप्रेस (२२२२९/२२२३०) : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (२२२२९) पावसाळ्यात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी आठवड्यातून तीन दिवस धावणार असून ती कणकवली स्थानकावर दुपारी १२.५० वा. पोहोचेल. परतीची वंदे भारत एक्सप्रेस (२२२३०) मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार असून ती कणकवली स्थानकावर दुपारी ०२.२८ वा. थांबेल
तेजस एक्सप्रेस (२२११९/२२१२०) :
मडगाव-मुंब तेजस एक्सप्रेस (२२११९) पावसाळ्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी धावेल. ही गाडी गुरुवार आणि कुडाळ स्थानकावर दुपारी ०२.५० वा. पोहोचेल. मडगावहून सुटणारी परतीची तेजस एक्सप्रेस (२२१२०) बुधवार, शुक्रवार, रविवारी धावणार असून ती कुडाळात दुपारी ०२४८ वा. आणि कणकवलीत दुपारी ०३.०४ वा. येईल.
जनशताब्दी (१२०५१/१२०५२)
मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस एक्सप्रेस (१२०५१) रोज धावणार असून ती कणकवली स्थानकावर दुपारी ०१.४० वा., कुडाळ ०२.२० वा., सावंतवाडी २.४२ वा. पोहोचेल. परतीच्या प्रवासात जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५२) सावंतवाडी दुपारी १.४० वा., कुडाळ २ वा. आणि कणकवली ०२.५० वा. येईल.
दिवा -सावंतवाडी एक्सप्रेस (१०१०५/१०१०६) : दिवा-सावंतवाडीकडे एक्सप्रेस (१०१०५) वैभववाडी रोड दुपारी ०३.५४ वा., आचिर्णे ०४.६ वा., नांदगाव रोड ०४.१६ वा., कणकवली सायंकाळी ०४.३३ वा., सिंधुदुर्ग ०४.५० वा., कुडाळ ०५.१० वा., झाराप ०५.३१ वा., सावंतवाडी रोड ०६.४५ वा. येईल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी- दिवा एक्सप्रेस (१०१०६) सावंतवाडीतून ८.२० वा. झाराप स.०८.५५ वा., कुडाळ ०९.०७ वा., सिंधुदुर्ग ०९.१८ वा., कणकवली ०९.३५ वा., नांदगाव रोड ०९.५० वा., आचिर्णे १० वा. आणि वैभववाडी १०.१० वा. येईल.
गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस (१२४५०/१२४४९): चंदिगड ते मडगाव गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस र (१२४५०) सोमवार, शनिवारी धावते. ही गाडी रत्नागिरीनंतर कणकवली स्थानकावर स. १०.२८ वा. थांबेल. परतीची मडगाव-चंदिगड एक्सप्रेस (१२४४९) मंगळवार, बुधवारी कणकवली स्थानकावर स. ११.०३ वा. पोहोचेल.
मुंबई -मंगळुरू जंक्शन एक्सप्रेस (१२१३३/१२१३४) : मुंबईवरून सुटणारी मुंबई- मंगळुरू एक्स्प्रेस (१२१३३) कणकवली स्थानकावर स. ०६.२० वा., तर परतीच्या प्रवासात मंगळुरू मुंबई एक्सप्रेस (१२१३४) कणकवली स्थानकावर रात्री ११.५४ वा. दाखल होईल
मडगाव- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (२२४१४/२२४१३). दिल्लीहून येणारी राजधानी एक्सप्रेस शनिवार, रविवारी (२२४१४) कुडाळ येथे स. ६.०२ वा., तर परतीची राजधानी एक्सप्रेस (२२४१३) सोमवार आणि मंगळवारी कुडाळ स्थानकावर सकाळी ०९.५० वा. येईल
मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस (१२६१८/१२६१७): दिल्लीकडून एर्नाकुलमकडे जाणारी दैनिक मंगला एक्सप्रेस (१२६१८) कणकवली स्थानकावर दुपारी ३ वा. पोहोचेल. परतीच्या प्रवासातील मंगला एक्सप्रेस (१२६१७) कणकवली स्थानकावर पहाटे ३.४४ वा. थांबेल.
हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस(२२६५६/२२६५५) : हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम एक्सप्रेस (२२६५६) ही साप्ताहिक गाडी सिंधुदुर्ग स्थानकावर स. ०८.५० वा., परतीची एर्नाकुलम ते निजामुद्दीन एक्सप्रेस (२२६५५) सायंकाळी ०५.५० वा.सिंधुदुर्ग स्थानकावर थांबेल.
अजमेर- एर्नाकुलम मरुसागर एक्सप्रेस (१२९७८/१२९७७): अजमेरवरून सुटणारी मरुसागर एक्स्प्रेस (१२९७८) शनिवार, रविवारी दुपारी ०१. ०८ वाजता सिंधुदुर्ग स्थानकावर, तर परतीची मरुसागर एक्सप्रेस (१२९७७) सोमवारी सकाळी ११.४८ वा. सिंधुदुर्ग स्थानकावर थांबेल.
भावनगर-तिरुवनंतपुरम एक्सप्रेस (१९२६०/१९२५९) : भावनगर ते तिरुवनंतपुरम एक्सप्रेस (१९२६०) बुधवारी थेट सिंधुदुर्ग स्थानकावर स. ०७.५० वा. तर परतीची तिरुवनंतपुरम-भावनगर एक्सप्रेस (१९२५९) शुक्रवारी दुपारी १२.५० वा. सिंधुदुर्ग स्थानकावर थांबेल.
गांधीधाम नागरकोईल एक्सप्रेस (१६३३५/१६३३६) : गांधीधाम ते नागरकोईल एक्सप्रेस (१६३३५) शनिवारी कणकवलीत सकाळी ०७.२८ . आणि सावंतवाडी रोड येथे सकाळी ०८.१८ वा. थांबेल. परतीची नागरकोईल -गांधीधाम एक्सप्रेस (१६३३६) बुधवारी सावंतवाडीत दुपारी १२.१६ वा.आणि कणकवलीत दुपारी ०१.१० वा.येईल.
मत्स्यगंधा व नेत्रावती एक्सप्रेस (१२६२०/१६३४६) : मंगळूर- मुंबई जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६२०) कुडाळ येथे रात्री ११.१२ वा. पोहोचेल, तर नेत्रावती एक्सप्रेस (१६३४६) कुडाळ स्थानकावर दुपारी ३.३० वा. प्रवाशांसाठी उपलब्ध असेल.
एलटीटी करमळी एक्प्रेस (२२११५/२२११६). लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी साप्ताहिक एसी एक्स्प्रेस (२२११५) दर गुरुवारी कणकवली येथे स. ०९.३० वा.व कुडाळ येथे सकाळी १० वा. थांबेल तर परतीच्या प्रवासात करमळी येथून मुंबईकडे जाताना (२२११६) ही गाडी त्याच दिवशी म्हणजे गुरुवारी कुडाळ येथे दुपारी ३ वा. आणि कणकवली येथे दुपारी ३.४८ वा. येईल.
एलटीटी मडगाव एक्स्प्रेस (११०९९/१११००) : एलटीटी-मडगाव दरम्यान धावणारी द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस मडगाव दिशेने जाताना (११०९९) दर शुक्रवार आणि रविवारी कणकवली येथे स. १०.१० वा. आणि सावंतवाडी रोड येथे स.११.१० वा.थांबेल. परतीच्या प्रवासात मुंबईकडे जाताना (१११००) ही गाडी दर शनिवार, सोमवारी सावंतवाडी रोड येथे दुपारी १२.५० वा. आणि कणकवली येथे दुपारी १.४८ वा.थांबणार आहे.
वांद्रे टर्मिनस (बीडीटीएस) -मडगाव एक्सप्रेस (१०११५/१०११६) : बांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी द्विसाप्ताहिक एक्प्रेस मडगाव दिशेने जाताना (१०११५) दर बुधवार व शुक्रवारी सायंकाळी ६.४० . कणकवली, ७ वा. सिंधुदुर्ग आणि ७.३० वा.सावंतवाडी रोड येथे थांबेल. परतीच्या प्रवासात (१०११६) ही गाडी दर मंगळवार व गुरुवारी सावंतवाडी रोडवरून सकाळी ०६,४० वा. सुटून कुडाळ ०७.१०, सिंधुदुर्ग ०७.२२ आणि कणकवली येथे ०७.४४ वा. येईल.
पुणे - एर्नाकुलम एक्प्रेस (२२१५०/२२१४९). पुणे ते एर्नाकुलम द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस एर्नाकुलम दिशेने जाताना (२२१५०) दर बुधवार व रविवारी पहाटे ०४.२६ वा.कणकवली आणि पहाटे ०५.०६ वा.सावंतवाडी रोड येथे थांबेल. परतीच्या प्रवासात पुणे दिशेने जाताना (२२१४९) ही गाडी दर बुधवार व शनिवारी सावंतवाडी रोड येथे सायंकाळी ५.२० वा. आणि कणकवली येथे सायंकाळी ६.२ वा. थांबणार आहे.
जबलपूर- कोईमतूर स्पेशल एक्सप्रेस(०२१९८/२०१६०/०२१९७/२०१५९) : जबलपूर -कोईमतूर साप्ताहिक एक्सप्रेस कोईमतूरकडे जाताना (०२१९८/२०१६०) दर शनिवारी रात्री १०.५० वाजता कणकवली आणि रात्री ११.२० वा. कुडाळ येथे थांबेल, परतीच्या प्रवासात जबलपुरकडे जाताना (०२१९७/२०१५९) ही गाडी दर मंगळवारी कुंडाळ येथे सकाळी ८ वा. आणि कणकवली येथे सकाळी ८.३० वा. थांबणार आहे
सुरत - मंगळुरू जंक्शन एक्स्प्रेस(०९०५७/१९०५७/०९०५८/१९०५८) : सुरत ते मंगळुरू जंक्शन स्पेशल एक्स्प्रेस मडगाव-मंगळुरू दिशेने जाताना (०९०५७/१९०५७) दर बुधवार, रविवारी वैभववाडी रोड सकाळी ०८.२० वा., कणकवली ९ वा., सिंधुदुर्ग ९.२० वा., कुडाळ ०९.३२ वा., सावंतवाडी रोड १०.१० वा. थांबेल. परतीच्या प्रवासात सुरतकडे जाताना (०९०५८/१९०५८) ही गाडी दर शुक्रवार व मंगळवारी सावंतवाडी रोड येथे सकाळी ०६.४० वा., कुडाळ ०७. १० वा., सिंधुदुर्ग ०७. २२ वा., कणकवली ०७.४४ वा.आणि वैभववाडी रोड येथे ०८.२० वा. थांबेल.
नागपूर - मडगाव एक्स्प्रेस (११२०३/११२०४) : नागपूर ते मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस मडगाव दिशेने जाताना (११२०३) दर बुधवार व शनिवारी दुपारी १२.४८ वा.कणकवली, १. २० वा. कुडाळ, १. ४० वा.सावंतवाडी रोड येथे थांबेल. परतीच्या प्रवासात नागपूरकडे जाताना (११२०४) ही गाडी दर गुरुवार व रविवारी सावंतवाडी रोड येथे रात्री ८.२६ वा., कुडाळ येथे ८. ४२ वा. आणि कणकवली येथे ९.२० वा.थांबेल.