खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या विशाल निर्धार मेळाव्याचे उ‌द्‌घाटन करताना मान्यवर व उपस्थित. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| खारेपाटण तालुका झालाच पाहिजे!

निर्धार मेळाव्यात मागणीवजा निर्धार; मेळाव्याला खारेपाटण दशक्रोशीतील सरपंच, लोकप्रतिनिधी व नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

नांदगाव : खारेपाटण तालुका व्हावा या मागणीकरिता गेली ४५ वर्षे सुरू असलेल्या चळवळीला विस्तारित स्वरूप देण्यासाठी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने रविवारी विशाल निर्धार मेळावा शेठ न. म. विद्यालयच्या सभागृहात नागरिकांचा प्रचंड उपस्थितीत उत्साहात झाला. या मेळाव्याला खारेपाटण दशक्रोशीतील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, गाव प्रमुख, मुंबईकर चाकरमानी तसेच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. खारेपाटण तालुका झालाच पाहिजे,असा मागणीवजा निर्धार या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थितांनी व्यक्त केला.

निर्धार मेळाव्याचे उद्‌घाटन तालुका कृती समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांच्या हस् करण्यात आले. जि. प.सदस्य प्राची इस्वलकर, माजी सभापती बाळा जठार, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, कालभैरव ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर गुरव, खारेपाटण व्यापारी असो. चे अध्यक्ष चेतन हुले, रोटरी क्लब अध्यक्ष मंगेश ब्रह्मदंडे, पं. स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे, देवगड पं. स. सदस्य सादिक डोंगरकर, राजेश जाधव, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, वारगाव सरपंच नाना शेटे, शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, चिंचवली सरपंच अशोक पाटील, बेर्ले -कुरंगवणे सरपंच संतोष ब्रम्हदंडे, वायंगणी उपसरपंच प्रताप फाटक, नडगिवे उपसरपंच भूषण कांबळे, शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, पोभूर्ले सरपंच प्रियांका धावडे, कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर, खारेपाटण गावचे खोत सुभाष ठाकुरदेसाई, शेजवली देवस्थान कमिटी प्रमुख श्रीधर कदम,, रिक्षा संघटना अध्यक्ष शेखर शिंदे, तृप्ती माळवदे, दिलीप तांबे, संतोष हरयाण, ॲड. प्रसाद करंदीकर, सतीश गुरव, रफिक नाईक, रुपेश सावंत आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT