कारची धडक बसली; आई ठार, पतीसह चिमुकली मुले बचावली (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Tragic Road Incident | कारची धडक बसली; आई ठार, पतीसह चिमुकली मुले बचावली

Highway Collision | महामार्गावर कसाल येथे कार व मोपेड यांच्यात धडक

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टिका कारने जोरदार धडक दिल्यामुळे ओरोस वर्दे रोड येथील सौ. शमिका शशांक पवार (वय 27) या जागीच ठार झाल्या. तर मोपेड चालक शशांक प्रकाश पवार (40) व त्यांचे चार महिन्याचे बाळ कु. पवित्रा व साडेतीन वर्षाचा प्रभास हा सुदैवाने बचावला. हा अपघात सोमवारी दु. 12.30 वा. दरम्यान झाला. सिंधुदुर्गनगरी पोलिस, महामार्ग पोलिस व कसाल सरपंच राजन परब यांनी जखमींना रुग्णालयात हलविले.

ईर्टिका कार मुंबईच्या दिशेने जात असताना कणकवलीच्या दिशेने जाणारे शशांक पवार यांनी महामार्गावर विरोधी दिशेकडील लेनवर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी भरधाव कारची धडक पवार यांच्या मोपेडला बसली. यात मोपेडवर मागे बसलेल्या शशांक पवार यांच्या पत्नी शमिका पवार या रस्त्यावर जोरदार आदळल्या. त्यात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. तर मोपेड स्वार शशांक पवार व मयत शमिका पवार यांच्या हातात असलेली चार महिन्यांची पवित्रा व मध्ये बसलेला साडेतीन वर्षाचा मुलगा प्रभास सुदैवाने बचावला.

याप्रकरणी ईर्टीका गाडीचा चालक राहुल शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अपघाताचे वृत्त समजतात घटनास्थळी मार्ग महामार्ग पोलिसांचे पथक तातडीने दाखल झाले. एएसआय प्रकाश गवस, नंदू गोसावी, रवी इंगळे, सागर परब ओरोस पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भुतेलो, गोसावी दाखल झाले. अपघात स्थळी नागरिकांनी ही मदत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT