Karul Ghat
वैभववाडी: करूळ घाटातील धोकादायक दरडी काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, आज सर्व काम पूर्ण करून उद्या शनिवार १३ सप्टेंबरपासून पूर्ववत वाहतूक सुरू होणार आहे. याबाबत आज अधिकृत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शाखा अभियंता पवन पाटील यांनी दिली आहे.
करूळ घाटात ४ सप्टेंबर रोजी गगनबावड्यापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर दरडीचा महाकाय भाग रस्त्यावर कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर पडलेली ही दरड काढत असताना येथे मोठ्या प्रमाणात दरडीला तडे गेल्याचे दिसून आले. त्यामुळे या धोकादायक दरडी कधीही कोसळतील, अशी परिस्थीती होती. अशा दरडीचा भाग काढल्याशिवाय वाहतूक सुरू करणे धोक्याचे होते. करुळ घाटातील धोकादायक दरडी काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून आज सर्व काम पूर्ण करून उद्यापासून वाहतूक सुरू होणार आहे.