सिंधुदुर्ग जिल्हा परिषद  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : प्रचार संपला; उद्या मतदान

मतदानासाठी यंत्रणा सज्ज ः 5,500 कर्मचारी, 2000 पोलिस, 3500 होमगार्ड तैनात

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वा. या वेळेत मतदान होणार आहे. गुरुवारी रात्री 10 वा. जाहीर प्रचार तोफा थंडावल्या. या निवडणुकीसाठी बंदोबस्तासाठी जिल्ह्याबाहेरूनही मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुमक दाखल झाली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वा. पासून निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी आपआपल्या मतदान केंद्रांवर एव्हीएम मशिन व अन्य साहित्य घेऊन रवाना होणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

सिंधुदुर्गात जि.प आणि पं.स. च्या 150 जागांपैकी 25 जागांवर उमेदवार बिनविरोध निवड झाल्याने उर्वरीत 125 जागांसाठी 359 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 810 मतदान केंद्रांवर 5 लाख 61 हजार 105 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात 8 सखी मतदान केंद्र व 8 आदर्श मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी 132 क्षेत्रीय दंडाधिकारी, 891 केंद्राध्यक्ष, 891 मतदान अधिकारी (1), 891 मतदान अधिकारी (2), 891 मतदान अधिकारी (3), 872 शिपाई, 872 व्यवस्थापक असे एकूण 5 हजार 440 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

याव्यतिरीक्त 8 निवडणूक निर्णय अधिकारी, 16 सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि 2 निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात संवेदनशिल केंद्राची संख्या निरंक आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस व होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यात जवळपास 2 हजार पोलिस आणि 3 हजार 500 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच ठाणे, नाशिक या जिल्ह्यातूनही पोलिस आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT