कणकवली ः कनकनगर येथील समृद्धी कोरगावकर यांच्या घरातील चोरट्याने फोडलेले कपाट तर दुसर्‍या छायाचित्रात सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला चोरटा. pudhari photo
सिंधुदुर्ग

कणकवलीत घरफोडी : सात लाखांचे दागिने लंपास

House robbery: चड्डी बनियनवरील चोरटा सीसीटीव्हीत कैद

पुढारी वृत्तसेवा

कणकवली ः कणकवली शहरातील कनकनगरमध्ये राहणार्‍या समृद्धी मिलिंद कोरगावकर यांच्या बंद घरामध्ये शनिवारी रात्री घरफोडी झाली. चोरट्याने सध्याच्या दराप्रमाणे सुमारे 7 लाखांचे दागिने लंपास केले. इमारतीतील सीसीटीव्हीमध्ये चड्डी बनियनमधील चोरटा कैद झाला आहे. कलमठ नंतर चार दिवसांत कणकवली शहरात घरफोडी झाल्याने पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

कलमठनंतर कणकवली शहरातील बंद घर चोरट्याकडून लक्ष करण्यात आले आहे. कनकनगरमध्ये राहणार्‍या कोरगावकर कुटुंबीयांचे बंद घर शनिवारी रात्री चोरट्याकडून फोडण्यात आले. याची तक्रार समृद्धी मिलिंद कोरगावकर यांनी रविवारी कणकवली पोलिसांत दिली.

समृध्दी कोरगांवकर शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचर म्हणून नोकरीला आहेत. शनिवारी सायंकाळी 6 वा.च्या सुमारास त्या घर बंद करुन नोकरीवर गेल्या होत्या. तर त्यांचे पती, सासरे व मुलगा मालवण येथे त्यांच्या नणंदेजवळ गेले होते.

शिरगाव येथून रविवारी स. 8.45 वा. च्या सुमारास समृध्दी कोरगांवकर घरी आल्या असता घराचा समोरील दरवाजा फोडलेला दिसला. त्यांनी घरात जावून पाहिले असता कपाटातील 65 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र, 13 ग्रॅमची सोन्याची चैन, लहान मुलांची चांदीची साखळी व देव्हार्‍यातील गणपतीची चांदीची मूर्ती चोरीस गेल्याचे दिसून आले. या दागिन्यांची किंमत 3 लाख 13 हजार 500 रु. असल्याचे सांगितले. मात्र या दागिन्यांचे सध्याचे बाजार मुल्य हे सुमारे 7 लाख रु. असल्याचे दिसून आले.

समृध्दी कोरगांवकर यांच्या घरात चोरी केल्यानंतर चोरट्याने लगतच्या इमारतीखाली उभ्या स्कुटरवरील रेनकोट चोरुन नेला. तसेच त्या भागात गटाराचे काम सुरु असल्याने तेथे राहणार्‍या राजन सावंत यांनी आपली कार पार्किंग केली असता चोरट्याने लोखंडी शिगेसारख्या वस्तूचा प्रहार करून कारची काच फोडली. लगतच्या इमारतीमध्ये असलेल्या सीसीटिव्हीमध्ये चोरटा दिसून येत आहे. स्कुटरवरील रेनकोट घेवून जातानाही तो दिसत असून त्या आधारे पोलिसांना तपास कामात सहकार्य होणार आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक अनिल हडळ करत आहेत.

स्कुटरवरील रेनकोटही नेला

समृध्दी कोरगांवकर यांच्या घरात चोरी केल्यानंतर चोरट्याने लगतच्या इमारतीखाली उभ्या असलेल्या स्कुटरवरील रेनकोटही चोरून नेला. तसेच, त्या भागात गटाराचे काम सुरू असल्याने तेथे राहणार्‍या राजन सावंत यांनी आपली कार पार्किंग केली होती. चोरट्याने लोखंडी सळईसारख्या वस्तूने प्रहार करून त्या कारची काचही फोडली असल्याचे समोर आले आहे.

चोरीला गेलेला मुद्देमाल

सोन्याचे मंगळसूत्र (65 ग्रॅम), सोन्याची चैन (13 ग्रॅम), लहान मुलांची चांदीची साखळी, देव्हार्‍यातील गणपतीची चांदीची मूर्ती, सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजित किंमत: सुमारे 7 लाख रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT