कणकवली : गेले दोन दिवस कोसळणार्या जोरदार पावसामुळे कणकवली तालुक्यात पाच घरांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये दोन घरांवर वादळी वार्याने झाडे पडून नुकसान झाले. लिंगेश्वरनगर येथील मॅक्सी गिरगोल फर्नांडिस यांच्या घराची भिंत कोसळून 5 हजार रु.चे नुकसान झाले.
हरकुळ खुर्द येथील गणेश यशवंत रासम यांच्या घराचे पत्रे फुटून 4 हजाराचे नुकसान झाले तर भिरवंडे -पूनाळवाडी येथील आत्माराम गणपत सावंत यांच्या घरावर फ झाडे पडून 10 हजाराचे नुकसान झाले आहे.
फोंडाघाट येथील हिरू लवू निकम यांच्या घराचे छप्पर पडून 10 हजार रू.चे तर बोर्डवे येथील बाळकृष्ण शंकर कदम यांच्या घरावर झाड पडून 1 हजार रू.चे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले.