कणकवली : वारगाव-रोडयेवाडी येथील प्रवीण उर्फ बबन आत्माराम गुरव (53) याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 112 ग्रॅम गांजा सदृश्य अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गैरकायदा ताब्यात ठेवल्याप्रकरणी संशयित प्रवीण गुरव याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गांजासह ताब्यात घेतले.
ही कारवाई मंगळवारी रात्री 10.30 वा. च्या सुमारास करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार त्याच्या घरावर छापा टाकून गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत सुमारे 3200 रु. आहे. संशयित प्रविण आत्माराम गुरव याला अटक करून बुधवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
याबाबतची फिर्याद एलसीबीचे पोलिस हवालदार आशिष जामदार यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महेश शेडगे करत आहेत.