कणकवलीत एकाच रात्री चोरट्यांनी आठ दुकाने फोडली 
सिंधुदुर्ग

Kankavali theft : कणकवलीत एकाच रात्री चोरट्यांनी आठ दुकाने फोडली

पोलिस स्टेशनजवळील घटना; मोबाईलसह 25 हजारांची रोकड लंपास

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : कणकवली पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तब्बल 8 दुकानांचे शटर आणि कुलुपे तोडून एकाच रात्रीत चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. बऱ्याच महिन्यांनंतर शहरात पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू झाल्याने पोलिस यंत्रणा हडबडली असून, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सीसीटीव्ही फुटेजवरून शनिवारी पहाटे 3 ते 4.30 च्या सुमारास चोरट्यांनी हा धुमाकूळ घातल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरट्यांनी राज मेडिकल, महालक्ष्मी पूजा भांडार, फेमस टेलरिंग, एस. पी. बोअरवेल, बाणे किराणा, स्वामी समर्थ स्टोअर्स आणि एका हॉटेलसह एकूण 8 दुकाने लक्ष केली. एस. पी. बोअरवेलमधून 12 हजार रोख व मोबाईल, किराणा दुकानातून 7 हजार, हॉटेलमधून 3,100 तर मेडिकल व इतर दुकानांतून किरकोळ रक्कम अशी हजारो रुपयांची रोकड लांबवली. सुदैवाने काही दुकानांत चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी स्मिता सावंत यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या घटनांची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी व्यापारी संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT