कणकवली: शहरात गेल्या दोन दिवसांपासून अवैध व्यवसायाविरुद्ध पोलिसांची मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. शनिवारी दारूच्या कारवाईनंतर, रविवारी पहाटे सुमारे चार वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी संशयित आरोपी शुभम संतोष गोसावी (वय 20, बांधकरवाडी) याला पंधरा हजाराच्या गांजासह ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल डॉमिनिक डिसोझा, तसेच पोलीस कॉन्स्टेबल सदानंद राणे, प्रकाश कदम, ज्ञानेश्वर तवटे, बसत्याव डिसोझा, जॅक्सन घोन्सलवीस, रुपाली खानोलकर आणि अमर कांडर यांनी केली. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.