ओरोस : आंतरराज्य घरफोडी व चोरी करणा-या दोन सराईत आरोपींना बेंगलोर, राज्य- कर्नाटक येथुन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला शिताफीने जेल बंद करण्यात यश आले आहे. या घरफोडी आणि मोटरसायकल चोरी प्रकरणातील अजूनही काही आरोपीचा तपास सुरू आहे. तसेच ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींना पोलीस कस्टडी मिळाली असल्याने पुढील तपासाची दिशा आरोपी शंकर मधुकर पवार उर्फ (हडया ) आणि राजू मधुकर पवार उर्फ ( उड्या ) याच्याकडून पुढील तपास सुरु होईल. उर्वरीत आंतरराज्य टोळी पकडण्यात दिशा मिळेल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या गुन्ह्याची माहिती देण्यासाठी सिंधुदुर्ग नगरी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम , गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक प्रविण कोल्हे, सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, विनोद कांबळी आदी उपस्थित होते
या वेळी बोलताना पोलीस अधिधक मोहन दहीकर म्हणाले दि. ०९ जुलै रोजी रात्री न्यू खासकौलवाडा, ता. सावंतवाडी येथे अज्ञात आरोपीनी श्रमविहार कॉलनी येथील घरामध्ये अनधिकृत प्रवेश करुन घरफोडीचा प्रयत्न केला. तसेच लक्ष्मीनगर येथील घरासमोरील एक मोटार सायकल व वेलनेस रिसॉर्ट समोरील मोटार सायकल व तेथील दोन मोबाईल चोरी करुन निघुन गेलेले होते. घटनास्थळी दोन पाळ कोयते मिळुन आलेले होते. या गुन्हयाचा तपास सांवतवाडी पोलीस ठाणे करीत होते. स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना संशयीत आरोपीत हे कोल्हापुर ते कर्नाटक असे प्रवास करुन बेंगलोर या ठिकाणी गेले बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाला गोपनीय माहिती समजून आली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तात्काळ बेंगलोर राज्य कर्नाटक येथे रवाना केले.
१२ जुलै रोजी बेंगलोर इलेक्ट्रीक शहरातील कामासंद्रा भागात लपुन बसलेले शंकर मधुकर पवार उर्फ (हड्या ) वय २५ व राजू मधुकर पवार उर्फ ( उडया ) हे दोन आरोपी मिळून आले. त्यांना ताब्यात घेवुन सावंतवाडी पोलीस ठाणे येथे आणुन चौकशी केली असता संशयीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. ते मोहोळ, जि. सोलापुर येथील आहेत. आरोपींतांना यापुर्वी महाराष्ट्र राज्यातील विवीध जिल्ह्यात ३० ते ३५ गुन्हयांमध्ये अटक करण्यात आलेली असून महाराष्ट्र, गोवा व कनार्टक राज्यात ते अनेक गुन्हयात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी त्यांनी संघटीत टोळीच्या मार्फतीने महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्यात गुन्हा केल्याचे दिसुन येते. पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक, प्रविण कोल्हे, अमोल चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक जे.ए. खंदरकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल- डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, बस्त्याव डिसोझा व जॅक्सन घोन्साल्वीस पोलीस अंमलदार प्रथमेश गावडे, धनश्री परब व युवराज भंडारी यांनी केली.