बांदा : अपघातानंतर पत्रादेवी नाक्यावर स्थानिकांनी रास्ता रोको केला. pudhari photo
सिंधुदुर्ग

पत्रादेवी येथे अपघातात इन्सुलीतील युवक ठार

Patradevi accident: ट्रकची दुचाकीला बसली धडक ; संतप्त ग्रामस्थांनी रोखला महामार्ग

पुढारी वृत्तसेवा

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर गोवा हद्दीतील पत्रादेवी येथील अबकारी तपासणी नाक्यासमोर ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने दुचाकीस्वार डॅनी फर्नांडिस (28, रा. इन्सुली- पागावाडी) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुणवारी दुपारी 2.30 वा. चा सुमारास घडला. पोलिस व अबकारी विभागाच्या अधिकार्‍यांसमोर हा भीषण अपघात होऊनही अपघात झाल्यानंतर ट्रक चालक जंगलात फरार झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले.

अपघात घडला त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी केली. मात्र सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने ग्रामस्थानी सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी वाहतूक रोखून धरली. पोलिसांनी चालकाला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आश्वासन देताच वाहतूक सुरळीत केली. तांबोसे गोवा येथून डॅनी हा दुचाकीने इन्सुलीकडे येत होता. पत्रादेवी येथील गोवा पोलिस तपासणी नाका तो आला असता अबकारी तपासणी साठी उभा असलेला ट्रक अचानक बाहेर आल्याने डॅनीच्या दुचाकीला धडकला. यात डॅनी गाडीच्या टायरखाली आला.

दरम्यान डॅनीच्या डोक्यावरून ट्रकचे टायर गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनसाठी त्याला गोवा बांबोळी येथे हलविले. डॅनी हा कुशल मॅकॅनिक होता. त्याचा स्वभाव मनमिळावू होता. त्याच्या अपघाती जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात वडील, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT