ऑपरेशन ‘ऑल आऊट’ अंतर्गत १ लाख ८३ हजार रुपयांची अवैध दारू जप्त 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : ऑपरेशन ‘ऑल आऊट’ अंतर्गत १ लाख ८३ हजार रुपयांची अवैध दारू जप्त

मालवण-कुमामे येथील महिलेवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

मालवण : ऑपरेशन ‘ऑल आऊट' अंतर्गत सिंधुदुर्ग पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात कारवाईला वेग आला आहे. या मोहिमेंतर्गत मालवण तालुक्याच्या कुमामे-गुरामवाडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महाराष्ट्र बनावटीची दारू व बीअर असा एकूण १ लाख ८३ हजार १४५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

२८ जुलै रोजी सायं. ७ वा.च्या सुमारास कुमामे, गुरामवाडी येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सीमा संदीप जगताप (वय ४८, रा. कुमामे, गुरामवाडी, ता. मालवण) या महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अति.पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक सुनील पाटील, हवालदार बस्त्याव डिसोझा, हवालदार विल्सन डिसोझा, हवालदार आशिष जामदार, महिला कॉन्स्टेबल स्वाती सावंत यांनी ही कारवाई केली.

अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

मालवण तालुक्यात अवैध दारूविक्री व इतर अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून सुरू कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळातही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT