तळेरे येथे ३८ लाखांची दारू जप्त 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : तळेरे येथे ३८ लाखांची दारू जप्त

महामार्ग पोलिसांची कारवाई : एकावर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

कणकवली :खारेपाटण महामार्ग येथील पेट्रोलिंग ड्युटीसाठी पोलिस तळेरे-औदुंबर याठिकाणी वाहनांची तपासणी करत थांबले असताना रविवारी सायंकाळी ३.५५ वा. च्या सुमारास गोवा ते मुंबई जाणाऱ्या आयशर टेम्पोतील चालकाचा संशय आल्याने पोलिसांनी टेम्पो थांबवला. पाहणी केली असता टेम्पोत गोवा बनावट दारूने भरलेले ८०० बॉक्स आढळून आले. सदर दारूची किंमत ३८ लाख ४० हजार रु. आहे. दारू व टेम्पोसह ५५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टेम्पोमध्ये प्रत्येक बॉक्समध्ये १८० मिली मापाच्या ४८बॉटलप्रमाणे एकूण ३८ हजार ४०० गोवा दारूने भरलेल्या प्लास्टिक सिलबंद बाटल्या होत्या. त्याची किंमत प्रत्येकी १०० रु. होती. तर १७ लाखांचा लाल रंगाचा आयशर टेम्पो ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी टेम्पो चालक नितीश रमेश तांबोस्कर (३७, रा. चराठे, टेंबवाडी, ता. सावंतवाडी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद एएसआय प्रकाश गवस यांनी कणकवली पोलिसांत दिली. ही कारवाई महामार्ग पोलिस उपनिरीक्षक जयराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रकाश गवस, हवालदार एकनाथ सरमळकर, विजय बिर्जे, पोलिस नाईक नितीन शेटये, पोलिस कॉ. सागर परब, श्री. खडपकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT