अशोक राजाराम शिंगरे pudhari photo
सिंधुदुर्ग

पत्नीवर खुनी हल्ला पतीस सश्रम कारावास

Domestic violence case: पराड येथील गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

ओरोस ः पत्नीवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी मालवण तालुक्यातील पराड येथील अशोक राजाराम शिंगरे (वय 62) याला 5 वर्षे सश्रम कारावास, 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास, अशी शिक्षा जिल्हा अति. सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी बुधवारी सुनावली.

4 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री 11 वा. पीडत महिला (आरोपीची पत्नी) ही अंथरुणावर झोपण्यासाठी गेलेली असताना आरोपी अशोक शिंगरे याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी भांडण करत तिला लोखंडी पाईपने मारहाण केली व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी आरोपीच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन मालवण पोलिस ठाण्यात श्री. शिंगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालवणचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी आवश्यक पुरावा गोळा करुन श्री. शिंगरे यांच्यावर वेळेत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गुन्हयातील फिर्यादी हा आरोपीचा मुलगा तर पीडित महिला ही पत्नी होती. त्याचबरोबर खटल्यास अन्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते.

खटला परिस्थितीजन्य व वैद्यकीय पुराव्यांवर शाबित करणे आव्हानात्मक होते. खटल्याची सुनावणी अति.सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांचे समोर होवून आरोपीस भा. दं. वि. कलम 307 अन्वये दोषी धरण्यात आले.या गुन्ह्यासाठी न्यायालयाने श्री. शिंगरे याला 5 वर्ष सश्रम कारावास, 5हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावलेली. अभियोग पक्षामार्फत सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी पाहिले. पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील, महिला पोलिस कॉन्स्टेबल अनुराधा कोळी यांनी खटला शाबीत होण्यासाठी आवश्यक ती मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT