किल्ले सिंधुदुर्गवर ऐतिहासिक राम नवमी सोहळा  
सिंधुदुर्ग

किल्ले सिंधुदुर्गवर ऐतिहासिक राम नवमी सोहळा

मालवणात भाविकांच्या अलोट गर्दीत राम नामाचा जयघोष आसमंतात दुमदुमला

पुढारी वृत्तसेवा

मालवण : मालवण तालुक्यात ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह तारकर्ली, आचरा, मालवण शहर, कांदळगाव यासह ग्रामीण भागातील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. किल्ले सिंधुदुर्ग वरील शिवराजेश्वर मंदिरात ऐतिहासिक शिवकालीन परंपरा जपत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.

मालवण तालुक्यात ठीक ठिकाणी रामनवमी उत्सव साजरा झाला. हिंदू बांधवांच्या या धार्मिक सोहळ्यात गावोगावी राम मंदिरात राम नामाचा जयघोष सुरू होता. मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात ऐतिहासिक थाटात रामनवमी साजरी करण्यात आली. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात संपन्न झाले. सकाळी श्री शिवराजेश्वर यांचे विधीवत पूजन, सकाळी 10 वाजता कीर्तनकार मंगेश परब यांचे श्री राम जन्माचे कीर्तन, 12.30 वाजता मंदिराच्या सभामंडपात साकारलेल्या पाळण्यात श्री रामप्रभूच्या मूर्तीला पाळण्यात घालण्यात आले.यावेळी श्री रामाच्या जय घोषाने फुले व गुलालाची उधळण करण्यात आली.यावेळी ढोल ताशाच्या गजरात शिवराजेश्वर मंदिराला पालखी प्रदिक्षणा घालण्यात आली.या पालखी मिरवणुकीत किल्ले सिंधुदुर्ग रहिवासी सहभागी झाले.

किल्ले सिंधुदुर्ग वरील ऐतिहासिक सोहळ्यात देवस्थानचे मुख्य पुजारी सयाजी सकपाळ, दिलीप सकपाळ, नामदेव सकपाळ, श्रीराम सकपाळ, हनुमंत वायंगणकर, मंगेश सावंत, दीपक फाटक, प्रसाद आडकर, नरेश सावंत, आदी किल्ले रहिवाशी उपस्थित होते. रात्री किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री शिवराजेश्वर नाट्य मंडळ सिंधुदुर्ग किल्ला यांचे शुभ मंगल सावधान हे दोन अंकी विनोदी नाटक संपन्न झाले. मालवण तालुक्यात किल्ले सिंधुदुर्गसह मालवण रामेश्वर मंदिर, कांदळगाव रामेश्वर मंदिर, तारकर्ली गवंडीवाडा राम मंदिर, तसेच आचरा रामेश्वर मंदिर येथे रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT