कुडाळ : येथे घेण्यात आलेल्या रंगीत तालीमवेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी.  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News | आपत्कालीन रंगीत तालिमीत महामार्ग प्राधिकरण नापास

कुडाळ तहसीलदारांनी घेतली अधिकार्‍यांची परीक्षा

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावर कुडाळ-उद्यमनगर नजीक वाहनांचा अपघात होऊन आग लागल्याचा दुरध्वनी पोलिस स्टेशन, अग्निशमन दलासह सर्व यंत्रणांना येताच लागलीच सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मात्र, महामार्गावर आपत्कालिन परिस्थिती निर्माण होऊनही महामार्ग विभागाचे अधिकारी अथवा प्रतिनिधी अनुपस्थित राहीले. आपत्कालीन परिस्थतीत या विभागाची अनास्था दिसून आली. घटनास्थळी नागरिकांचीही गर्दी झाली. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा सुरू केला. नेमके काय झाले, हे कोणालाच समजत नव्हते, प्रशासनाचीही एकच तारांबळ उडाली. शेवटी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने घेण्यात आलेली हि रंगीत तालीम असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ही रंगीत तालीम शुक्रवारी सायंकाळी 4.30 ते 5.30 वा. या वेळेत घेण्यात आली. मात्र, या रंगीत तालीमवेळी महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी अथवा प्रतिनिधी घटनास्थळी न पोहोचल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

एखादी अचानक आपत्ती आली तर संबंधित यंत्रणा किती अलर्ट आहेत आणि किती वेळात घटनास्थळी पोहोचतात याची रंगीत तालीम शुक्रवारी सायंकाळी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी घेतली. या परीक्षेत ज्या ठिकाणी अपत्त्ती घडल्याचे कळविण्यात आले होते तो महामार्ग प्राधिकरण विभाग मात्र यात सपशेल फेल झाला. महामार्ग विभागाचे कोणीच अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी फिरकले नाहीत तर सार्व. बांधकाम विभागाच्या कुडाळ कार्यालयाने आमच्या अखत्यारीत हा भाग येत नाही, असे कळविले. त्यामुळे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालिन परिस्थिती ओढवल्याचे कळवूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी किंवा त्यांचे पथक घटनास्थळी अनुपस्थित राहिल्याने नाराजी व्यक्त केली.

तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय नैसर्गिक आपत्ती अनुषंगाने रंगीत तालीम मुंबई- गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर नजिक हॉटेल लेमनग्रास समोर आयोजित करण्यात आली होती. रंगीत तालीम दरम्यान सहा.महसूल अधिकारी नीता पवार यांनी तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षातून सर्व यंत्रणांना घडलेल्या घटने संदर्भात माहिती देऊन समन्वय साधला. त्याला प्रतिसाद देत पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम 6 मिनिटात पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभाग प्रमुख प्रमोद परब हे पथकासह आणि अग्निशामक बंबासह 9 मिनिटात दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ आग विजवली. नगरपंचायत विभागाचे गजानन पेडणेकर हे फायर बाईकसह तसेच संजय टेबुलकर पथकासह 14 मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. आरोग्य सहायक राघोजी चेंदवणकर, आरोग्य सेवक रवींद्र गावडे, तसेच प्रा. आ. केंद्र पणदूरची अ‍ॅम्ब्युलन्स व आरोग्य पथक डॉ. कविता पराडकर, नर्स श्रीम, टेमकर यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्याच बरोबर निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, महसूल नायब तहसीलदार संजय गवस, नायब तहसीलदार प्रमोद पिळणकर, मंडळ अधिकारी श्री गुरव, ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी घटना स्थळी धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT