देवगड :दीपावलीच्या पहिल्याच दिवशी देवगड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. संध्याकाळी 5 वा.पासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने अनेक भागात वीज गायब झाली होती.
दीपावलीचा पहिलाच दिवस असल्यामुळे बाजारपेठांमध्ये विविध वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती; मात्र मेघगर्जनासह अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दिवाळीच्या तोंडावर गुलाबी थंडीची चाहूल लागते.मात्र गेल्या काही वर्षांत पर्यावरणीय समतोल ढासळल्याने नैसर्गिक आपत्तीत वाढ झाली आहे.
शेती व बागायती पिकांची यामुळे नुकसान होत आहे. भात पीक कापणी सुरू असून यंदा दीपावलीला पोहे बनविण्यासाठी भात बहुतेक ठिकाणी शेतकर्यांना मिळू शकले नाही. तसेच पाऊस लांबल्याने भात कापणीही लांबली आहे.