Leopard Terror File Photo
सिंधुदुर्ग

Ratnagiri News : गुहागरमधील काजळी गावात बिबट्याची दहशत

एका घराच्या आवारात आढळून आला बिबट्या

पुढारी वृत्तसेवा

गुहागर शहर : गुहागर-विजापूर महामार्गालगत असलेल्या काजळी गावामध्ये एका बिबट्याने दहशत माजवली आहे. स्थानिक रहिवासी दर्शन चव्हाण यांच्या घराच्या आवारात गेल्या अनेक दिवसांपासून मध्यरात्री एका महाकाय बिबट्याचा वावर कमालीचा वाढला आहे. विशेष म्हणजे हा बिबट्या कधीतरी नव्हे, तर दर एक-दोन दिवसाआड या घराभोवती तासनतास फेर्‍या मारत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. चव्हाण यांनी घरात सीसीटीव्ही बसवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेमुळे चव्हाण कुटुंबासह संपूर्ण काजळी गावामध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन चव्हाण यांच्या घरात सध्या केवळ तीन महिलाच राहतात. त्यापैकी एक महिला सातत्याने आजारी असते. त्यामुळे रात्री-अपरात्री कोणत्याही कामासाठी किंवा वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास या महिलांना जीव मुठीत घेऊन बाहेर पडावे लागत आहे. दारातच बिबट्याचा वावर असल्याने या कुटुंबाची सुरक्षा आता पूर्णपणे धोक्यात आली आहे.

त्यातच आता अवघ्या काही दिवसांवर लाडक्या गणरायाचे म्हणजेच गणेशोत्सवाचे आगमन होत आहे. कोकणात गणेशोत्सवा दरम्यान रात्री शेजारी-पाजारी आरती, भजन व जागर करण्यासाठी जाण्याची जुनी प्रथा आहे. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी गावात फिरणे अत्यंत जोखमीचे बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT