सिंधुदुर्ग : कारमधून होणार्या गोवा दारूची विनापरवाना वाहतुकीवर दोडामार्ग- चंडगड मार्गावरील वीजघर पोलिस चेकपोस्ट येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत 19 हजार 200 रूपयांच्या गोवा दारूसह सुमारे 3 लाख रूपयांची दारू जप्त करण्यात आली. दरम्यान या कारवाई दरम्यान कार मधील दोघेजन काळोखाचा फायदा घेऊन पसार झाले.
दोडामार्ग -वीजघर पोलिस चेकपोस्ट येथे सोमवारी रात्री वाहनांची नियमीत तपासणी सुरू होती. रात्रौ 11.15 वा. च्या तेथे आलेली गोवा पासिंग स्विफ्ट कार पोलिसांनी तपासणीसाठी थांबवली. कार मध्ये चालक व त्याचा सहकारी असे दोन इसम होते. तपासणी दरम्यान कार मध्ये गोवा दारूचे बॉक्स सापडून आले. आपली चोरी उघडकीस आल्याचे पाहून कार मधील दोघेही कार तिथेच ठेवून अंधाराचा फायदा घेवून पळून गेले.
कारमध्ये सापडलेल्या दारूची किंमत 19 हजार 200 रुपये असल्याचे पोलिसांनी पंचनाम्यात म्हटले आहे. या दारूसह तीन लाखाची कार मिळून एकूण 3 लाख 19 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर फारार झालेल्या दोन संशयितांव महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई दोडामार्गचे पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांचे मार्गदर्शनाखाली पो.कॉ. अक्षय टिळेकर व सहकार्यांनी केली.