आचरा : महावितरणच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता खुर्चीला हार घालताना शिवसैनिक 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Achara Mahavitaran Engineer Vacancy | उपकार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला घातला हार

Achara Mahavitaran Engineer Vacancy- उपकार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला घातला हार

पुढारी वृत्तसेवा

आचरा : आचरा महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता पद दोन वर्षे रिक्त असल्याने परिसरातील वीज ग्राहकांच्या समस्या प्रलंबीत रहात आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे शिवसेनेने आचरा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. या नुसार गुरुवारी सकाळी आचरा विभागातील ठाकरे सेनेचे कार्यकंनी मंदार ओरस्कर, बाबी जोगी यांच्या नेतृत्वाखाली आचरा वीज कार्यालयाकडे घोषणा देत आंदोलन सुरू केले.

कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्यांच्या रिक्त खुर्चीला फुलांचा हार घालत निषेध नोंदवला. अखेर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रिक्त पदे भरण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर तब्बल दोन तासांनी आंदोलन स्थगित करण्यात आले. नगरसेवक मंदार ओरसस्कर, बाबी जोगी, माजी सरपंच मंगेश टेमकर, मच्छीमार नेते नारायण कुबल, ग्रामपंचायत सदस्या पूर्वा तारी, केदार परुळेकर, जगदीश पांगे, लवू मालंडकर, चंदन पांगे, समीर लब्दे, नितीन घाडी, मुन्ना परब, सचिन परब, अवी परब, आबा सावंत, शाम घाडी, राजू नार्वेकर आचरा पंचक्रोशीतील शिवसैनिक, ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.

ग्रामस्थ, कार्यकर्त्यांनी कार्यालयात ठिय्या मांडला. दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळताच महावितरण कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भांबरे, उपकार्यकारी अभियंता श्री. मोर्ये आचरा कार्यालयात दाखल झाले. वीज ग्राहक व शिवसैनिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. गेली दोन वर्षे या कार्यालयाला कोणीही वाली नाही. त्यामुळे अधिकारी, लाईनमन, वायरमन यांच्यावर कोणाचाही वचक नाही. आचरा भागात दिवसेंदिवस वीज समस्या वाढत आहेत. ग्राहकांचा विरोध असतानाही घरात स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. त्याची भरमसाठ बिले ग्राहकांवर लादली जात आहेत, याला जबाबदार कोण? असा सवाल केला.

बंद घरांचे युनिट २५० च्या वर काढून ३००० रुपयांपेक्षा अधिक रकमेची बिले येत असल्याचे ग्रामस्थांनी पुराव्यानिशी दाखवून दिले. यानंतर कार्य. अभियंता श्री. भामरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत, आचरा कार्यालयातील रिक्त जागेवर अभियंता उपलब्ध करण्याची मागणी केली. यानंतर येत्या दोन आठवड्यात आचरा कार्यालयात अभियंता देण्याचे लेखी आश्वासन श्री. भांबरे यांनी दिले. महावितरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे 'टाळे ठोको' आंदोलन स्थगित केले. या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

आचऱ्यासाठी दोन अभियंत्यांची नियुक्ती

आचरा उपविभाग व आचरा शाखा कार्यालयातील रिक्त अभियंता पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार उपकार्यकारी अभियंता म्हणून ईश्वर महादेव पेडणेकर व सहा. अभियंता म्हणून मनोहर सिद्राम पवार यांची नियुक्ती केली आहे. संबंधित दोन्ही अभियंते वैयक्तिक कारणामुळे अद्याप हजर झाले नसून त्यांना तातडीने रुजू होण्याबाबत सूचना दिल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT