शिरोडा येथे झाडाझडती घेताना पोलिस. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg |शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या घरात सापडला गांजा, कोकेन

वेंगुर्ले पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मळगांव : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली विळख्याविरोधात पदार्थांच्या पोलिसांनी थेट अॅक्शन घेत शुक्रवारी धडक कारवाई केली. शिरोडा येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश ऊर्फ भाई परब याच्या घरावर पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करण्यात आला. वेंगुर्ले पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

संशयित सिद्धेश अचानक छापा टाकला. त्याच्या ऊर्फ भाई परब घरातून गांजा आणि कोकेनसदृश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्याला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी 'नशामुक्त सिंधुदुर्ग' हे अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यातील अमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि ड्रग्जचे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे कडक निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात तपास तीव्र केला होता. सिद्धेश परब याच्या घरात अमली पदार्थांचा साठा ठेवल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी सकाळी पोलिसांनी परब याच्या घरावर छापा टाकला.

या कारवाईबाबत पोलिस निरीक्षक यांनी दुजोरा दिला असून, संशयितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

शिवसेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या घरात हे अमली पदार्थ नेमके आले कुठून ? ते विक्रीसाठी ठेवले होते की सेवनासाठी? आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे? याचा कसून शोध पोलिस घेत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी स्वतः 'ऑन फिल्ड' उतरून धडक कारवाया करत असल्याने अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाच्या सखोल तपासाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT