देवगड आरे जेठेवाडी येथे गव्यांचा वावर  Pudhari File photo
सिंधुदुर्ग

देवगड-आरे-जेठेवाडी येथे गव्यांचा मुक्त वावर

पुढारी वृत्तसेवा

शिरगांव | संतोष साळसकर

देवगड तालुक्यातील आरे गावामध्ये सध्या गवा रेड्यांचा मुक्तपने संचार सूरु असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. आरे जेठेवाडी येथे गव्यांचा कळप आढळून आल्यामुळे, आरे गावाचे उपसरपंच रत्नदीप कांबळे यांनी येथील बागायत परिस्थितीची पाहणी करून गवारेड्यांचे गावातील मुक्तपणे वावरा विषयीचे गांभीर्य लक्ष्यात घेत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व वन विभागास कळउन या नुकसान भरपाईचा आढावा घेतला.

देवगड तालुक्यात आरे गावातील संपूर्ण पंचक्रोशी परिसरामध्ये सध्या गवरेद्यांचा मुक्तपने वावर असल्याचे दिसून आले आहे.यासंदर्भात आरे जेठेवाडी येथील राजू जेठे यांच्या बागेमध्ये गव्यांचा कळप असल्याचे आरे जेठेवाडी येथील गुरांचे डॉक्टर विकास जेठे यांच्या निदर्शनास आले होते.ह्या काळपामध्ये साधारणतः सात ते आठ गवे होते.त्यानंतर सदर जागेवर जंगली गव्यांच्या पाऊलखुणा पहावयास मिळाल्या आहेत. आरे उपसरपंच कांबळे यांनी तात्काळ वनविभागाला ग्रामपंचायत आरे च्या वतीने कळविले. त्यानंतर देवगड चें नवीन वनपाल परीट आपले सहकारी घुगे यांच्यासोबत ग्रामपंचायत येथे दाखल झाले. व यावेळी घटनास्थळावर जाऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT