Crime News Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून वृद्ध महिलेवर लोखंडी रॉडने खुनी हल्ला

फरार संशयित आठ तासात जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले : दारू पिण्यासाठी मागितलेले पैसे दिले नाही म्हणून मनात राग धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले कॅम्प येथे एका वृद्ध महिलेवर हरेश निकम उर्फ 'पबजी' ( मूळ रा. चिपळूण, सध्या रा. वेंगुर्ले कॅम्प) याने लोखंडी रॉडने खुनी हल्ला केला. या हल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. तर हल्ला करून फरार संशयित पबजी याला वेंगुर्ले पोलिसांनी आठ तासात पकडलेे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत वेंगुर्ले कॅम्प येथील नीलेश राठोड याने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रारीत दिली. कॅम्प येथील झोपडीमध्ये माझी आई रात्री झाडू मारत होती. यावेळी तेथे पबजी आला. त्याने माझ्या आईकडे दारूसाठी पैसे मागितले, मात्र तीने ते दिले नाही या रागाने त्याने आईला शिवीगाळ करून लोखंडी रॉड तिच्या डोकीवर, चेहऱ्यावर व छातीवर जोरात मारून तिला गंभीर जखमी केले व तेथून पळून गेला. या तक्रारीवरून पोलिसांनी पबजी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

रात्रीपासून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आणि अवघ्या आठ तासात त्याला शेतातून पकडून आणले. सदर कारवाई मध्ये सहा.पोलीस उपनिरीक्षक भीमसेन गायकवाड, उपनिरीक्षक श्री. राठोड, उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, हवालदार मळगावकर, मनोज परुळेकर, जयेश सरमळकर यांचा सहभाग होता. अधिक तपास पो.उ.नि. शेखर दाभोलकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT