सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मडगाव-सावंतवाडी आणि सावंतवाडी-दिवा या दोन पॅसेंजर गाड्यांना कायमस्वरूपी अतिरिक्त वातानुकूलित डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे प्रवाशांना आता अधिक आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
गाडी क्रमांक 50108 / 50107 मडगाव जंक्शन - सावंतवाडी रोड - मडगाव जंक्शन पॅसेंजर: सध्याची रचना: 2 वातानुकूलित थ्री-टियर इकॉनॉमी डबे, 12 सामान्य डबे, 1 जनरेटर कार आणि 1 एसएलआर (एकूण 16 एलएचबी डबे). नवीन रचना: 3 वातानुकूलित थ्री-टियर इकॉनॉमी डबे, 12 सामान्य डबे, 1 जनरेटर कार आणि 1 एसएलआर (एकूण 17 एलएचबी डबे).,प्रारंभ:गाडी क्रमांक 50108 मडगावहून 15 जुलै पासून, तर गाडी क्रमांक 50107 सावंतवाडी रोडहून 16 जुलै पासून नवीन रचनेसह धावेल.
गाडी क्रमांक 10106 / 10105 सावंतवाडी रोड - दिवा जंक्शन - सावंतवाडी रोड दैनिक: या गाडीतही कायमस्वरूपी एक अतिरिक्त वातानुकूलित डबा जोडला जाणार आहे. मडगावहून सावंतवाडीला आलेली गाडीच पुढे दिवा जंक्शनपर्यंत धावते, त्यामुळे दोन्ही गाड्यांची डबा रचना समान असेल. प्रारंभ:सुधारित रचनेनुसार गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी रोडहून 15 जुलै पासून, तर गाडी क्रमांक 10105 दिवा जंक्शनहून 16 जुलै पासून या बदलासह धावेल.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, या गाड्यांचे थांबे आणि वेळापत्रक तपासण्यासाठी त्यांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा छढएड अॅप डाउनलोड करा. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या कायमस्वरूपी अतिरिक्त डब्यांमुळे गोवा आणि कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.