मंत्री नितेश राणे pudhari photo
सिंधुदुर्ग

वेंगुर्ला येथील जिल्हास्तरीय महोत्सवाचे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

Sindhudurg News | ५ जानेवारी रोजी महोत्‍वाचा समारोप

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले : नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई व जिल्हा सहआयुक्त नगर विकास शाखा, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय वार्षिक क्रिडा - सांस्कृतिक महोत्सव सुरु आहे. बक्षीस वितरण मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउ‌द्देशीय सभागृह येथे रविवार ५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास आमदार शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर क्रीडा महोत्सव ३ जानेवारी ते ५ जानेवारी या कालावधीत वेंगुर्ले येथे होत आहे. या महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ नगरपरिषदा - नगरपंचायती व जिल्हा सह आयुक्त कार्यालय अशी एकूण ९ कार्यालयातील एकूण ४०० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.

या क्रीडा महोत्सवात एकूण १७ खेळ समाविष्ट असून विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य व कास्य पदक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकणाऱ्या संघाला सर्वसाधारण विजेता चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास वेंगुर्ला शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर व वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT