देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती निवडणुकीत भाजपने पुन्हा वर्चस्व राखले. विषय समिती सभापती निवडणुकीमध्ये बांधकाम सभापतिपदी रोहन खेडेकर, पाणीपुरवठा सभापतिपदी सौ. तन्वी चांदोस्कर, स्वच्छता आरोग्य सभापतिपदी निवृत्ती ऊर्फ बुवा तारी तर महिला बालकल्याण उपसभापतिपदी मनीषा जामसंडेकर यांची बिनविरोध निवड झाली.
देवगड-जामसंडे नगरपंचायत सभापती निवडणूक मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सौ.गौरी पाटील यांच्या उपस्थितीत झाली. बांधकाम सभापतीपदी रोहन खेडेकर, पाणीपुरवठा सभापतिपदी सौ.तन्वी चांदोस्कर, स्वच्छता आरोग्य सभापतिपदी निवृत्ती उर्फ बुवा तारी तर महिला बालकल्याण उपसभापतिपदी मनीषा जामसंडेकर यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
या निवडणुकीत रोहन खेडेकर, निवृत्ती उर्फ बुवा तारी, सौ.तन्वी चांदोस्कर व मनीषा जामसंडेकर या चौघांचीही बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर त्यांचे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवक यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. भाजपा देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, उपनगराध्यक्ष सौ. मिताली सावंत, भाजपा गटनेते शरद ठुकरूल, महिला तालुकाध्यक्षा उष:कला केळूस्कर, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, बाळा खडपे, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, सौ.प्रियांका साळसकर, शहरअध्यक्ष वैभव करंगुटकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, उल्हास मणचेकर, ज्ञानेश्वर खवळे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सर्फराज शेख, सौ.मनस्वी घारे, प्राजक्ता घाडी, तन्वी शिंदे, संतोष तारी, प्रणाली माने, स्वरा कावले, रूचाली पाटकर, आद्या गुमास्ते, चंद्रकांत कावले आदी उपस्थित होते.