देवगड समुद्रात कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर नौका जप्त 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| देवगड समुद्रात कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर नौका जप्त

१५ दिवसांत मत्स्यव्यवसाय विभागाची दुसरी मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. देवगड समुद्रात विनापरवाना मासेमारी करणारी कर्नाटक-मलपी येथील ‘हनुमा ध्याना’ ही हायस्पीड ट्रॉलर नौका जप्त करण्यात आली. गेल्या १५ दिवसांतील विभागाची ही दुसरी मोठी कारवाई असून, या कारवाईमुळे स्थानिक मच्छीमारांमधून समाधान व्यक्त होत आहे.

१८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वा.च्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाला आचरा समुद्रात सुमारे ९ ते १० नॉटिकल मैल अंतरावर ही नौका ट्रॉलिंग पद्धतीने विनापरवाना मासेमारी करताना आढळली. गस्ती नौकेला पाहताच संबंधित समोरील समुद्रात या नौकेला पकडले. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारित अधिनियम २०२१ मधील तरतुदींनुसार नौका ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. या नौकेवर तांडेलसह सात खलाशी आहेत. ताब्यात घेतलेली नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून, तिच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

जप्त करण्यात आलेल्या नौकेचे नाव ‘हनुमा ध्याना’ असून, सुनील शेखर कोट्यान (रा. उडुपी) हे या नौकेचे मालक आहेत. या कारवाईचा सविस्तर अहवाल सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय परवाना अंमलबजावणी अधिकारी प्रतीक महाडवाला यांच्या नेतृत्वाखाली ‘शीतल’ गस्ती नौकेद्वारे ही कारवाई करण्यात आली. सागरी सुरक्षा रक्षक दिवाकर जुवाटकर, संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्निल सावजी यांनी या मोहिमेत सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT