Devgad Robbery Case (File Photo)
सिंधुदुर्ग

Devgad Robbery case | हिंदळे-मोर्वे येथील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडली

20000 cash stolen | एका घरातील 20 हजारांची रोकड लंपास

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड तालुक्यातील मोर्वे येथे चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य केली असून दोन बंद घरांची कुलूपे चोरट्यांनी फोडली. यामध्ये एका घरातील रोख 20 हजार रूपये रक्कम चोरट्यांनी लंपास केली तर दुसर्‍या घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 7 जुलेै सायंकाळी 7 वा. ते 8 जुलै सकाळी 9 वा. या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदळे मोर्वे -ओवळेश्वर वाडी येथील अविनाश काशीराम हिंदळेकर (54) आणि शारदा शरद शिरवडकर यांच्या बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य केली. अविनाश हिंदळेकर हे नोकरी निमित्त मुंबई -गोरेगाव येथे वास्तवास असल्याने त्यांचे गावातील घर बंद असते. त्यांचा घराच्या परिसरातील साफसफाईचे काम त्यांची भावजय सुप्रिया संतोष हिंदळेकर ही करते. हिंदळेकर यांच्या घराशेजारीच राहत असलेल्या नम्रता सुशांत बापर्डेकर यांनी सुप्रिया यांना तेथिलच शारदा शरद शिरवडकर यांच्या घरी चोरी झालेली आहे त्यामुळे अविनाश हिंदळेकर यांचे बंद घरही तु चेक कर असे सांगितले.

यावेळी सुप्रिया हिंदळेकर यांनी घराकडे जावून पाहिले असता अविनाश हिंदळेकर यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले त्यांनी याबाबत घरमालक अविनाश हिंदळेकर यांना फोनवरून कळविले. हिंदळेकर हे मुंबईहून गावी मोर्वे येथे आले आणि त्यांनी देवगड पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील 20 हजार रूपये रोख रक्कम चोरून नेल्याची तसेच घराशेजारीच असलेल्या शारदा शरद शिरवडकर यांच्या घराच्या मुख्य. असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द भारतीय न्याय संहिता 305, 331 (3), 331 (4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक महेश देसाई करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT