Crime News  Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : घरगुती वादातून सख्ख्या भावाला बांबूने मारहाण; तिघांवर गुन्हा

हिंदळे-मोर्वेवाडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

देवगड : किरकोळ घरगुती वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यात लाकडी बांबूने मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी हिंदळे-मोर्वेवाडी येथील तिघांविरुद्ध देवगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर अनंत धुरत (वय ५५), त्यांची पत्नी प्रियांका शंकर धुरत (वय ४५) आणि मुलगा ओजस शंकर धुरत (वय २२) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदळे-मोर्वेवाडी येथील शंकर धुरत आणि त्यांचे भाऊ संतोष अनंत धुरत (वय ४९) यांच्यात घरगुती कारणावरून वाद आहेत. संतोष हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असून, सणासुदीच्या काळात गावी येतात.

बुधवारी सकाळी शंकर यांनी संतोष यांना घराबाहेर असलेली लाकडी खोप काढून ठेवण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. यावेळी शंकर यांनी संतोष यांच्या डोक्यात लाकडी बांबूने मारहाण केली. तसेच प्रियांका आणि ओजस यांनी संतोष यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी संतोष धुरत यांनी देवगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शंकर, प्रियांका आणि ओजस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार गणपती गावडे करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात परस्परविरोधी फिर्यादही दाखल करण्यात आल्याची माहिती देवगड पोलिसांनी दिली. त्यानुसार दुसरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT