Online Financial Fraud  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Devgad Crime | सायबर फसवणुकीतील ३.४० लाखांची रक्कम देवगडातील युवकाच्या खात्यात; गुन्हा दाखल

देशभरातील १२ तक्रारदारांची ऑनलाइन फसवणुकीची रक्कम खात्यात जमा करून पुढे वर्ग केल्याची फिर्याद

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देशभरातील विविध राज्यातील १२ तक्रारदारांनी ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने एनसीसीआरपी पोर्टलवर सदर पडताळणी केली असता १२ तक्रारदारांच्या एकूण ३ लाख ४० हजार ९८१ रुपये ८९ पैसे इतकी रक्कम देवगड येथील एका युवकाच्या बँक ऑफ इंडिया खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही रक्कम नंतर संबंधित खात्यातून काढून इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी देवगड पोलिसांनी रक्कम जमा झालेल्या संबंधित खातेदारावर गुन्हा दाखल केला आहे. देशभरातील १२ तक्रारदारांनी ऑनलाइन फसवणुकीबाबत नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर संबंधित फसवणुकीची रक्कम देवगड येथील एका युवकाच्या बँक ऑफ इंडिया खात्यावर जमा झाल्याचे आढळून आले.

याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अन्विता आशिष कदम यांनी फिर्याद दाखल केली आहे. तपासात, ३ जानेवारी २०२५ ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत फसवणुकीची एकूण ३ लाख ४० हजार ९८१ रुपये ८९ पैसे संबंधित युवकाच्या खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही रक्कम विविध माध्यमांतून काढून इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

सायबर गुन्ह्यांमधून मिळालेली फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी संबंधित युवकाच्या बँक खात्याचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४), ३१७(५) आणि ६१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शाम बुवा करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT