देवगड : देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी बुद्धगया महाचोची महाविहार मुक्ती निर्धार रॅली देवगड कॉलेज नाका येथून तहसील कार्यालयावर काढण्यात आली. या रॅलीत बहुसंख्येने धम्म उपासक व समाजबांधव उपस्थित होते. बोधगया विहार येथील महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करण्यात यावा व महाबोधी बुद्धविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात पाये, अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदार आर. के. पवार यांच्याकडे देण्यात आले.
देवगड तालुका बौद्धजन सेत्रा संपाच्या वतीने शुक्रवारी सकाळी भव्यदिव्य निर्धार रॅली काढण्यात आली. देवगड कॉलेजनाका ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये बहुसंखयेने धम्म उपासक व समजावांधव उपस्थित होते. देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने राष्ट्रपती यांच्याकडे निवेदन देण्यासाठी तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. बिहार येथील महाबोधी महाविहार है वौद्धांच्या ताब्यात मिळविण्यासाठी गेली कित्येक वर्षे बौद्ध भंते प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या लक्ष्धाला संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळत आहे, महाबोधी महाविहार हे सन १९४९ च्या कायद्यानुसार समसमान
प्रतिनिधींची निवड करून त्यामध्ये खरे पाहता सर्वच्या सर्व बौद्ध प्रतिनिधी नेमणे आवश्यक होते. मात्र असे न करता बौद्ध विहार हिंदू धर्मियामधील महंत लोकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ते महंताच्या ताब्यातून तत्काळ मुक्त करण्यात यावे व बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात याचे. सन १९४९ ची. टी. अॅक्टचर महाबोधी बुद्ध विहार संदर्भात भारतीय राज्य घटनेच्या कलम २४५ नुसार केलेला कायदा रद्द करण्यात यावा फक्त बौद्ध धर्मियांसाठी नवीन कायदा अस्तित्पात आणावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आमचा हा लदा महाबोधी महाविहार मुक्तीवा असून न्याय मिळेपर्यंत हा मुक्तिसंग्राम सुरूच राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बौध्दजन सेवा संघाचे अध्यक्ष शामसुंदर जाधव, उपाध्यक्ष सुरेश कदम, सचिव सुनिल जाधव, डी. के. पडेलवार, मनोहर सावंत, महिला अध्यक्ष पूजा जाधव, सुरभी पुरळकर, विनायक मिठबांवकर, विजय कदम, के. एस्. कदम, अजित कांबळे, विशाखा साळसकर, रश्मी पडेलकर, नितेश जाधव, आनंद देवगडकर, श्रीपत टेंबवलकर, दिलीप कदम, राजू साळसकर, समीर शिरगावकर, सुमित कदम, प्रविण मोरे, अभिषेक कदम, महेश परुळेकर आदी पदाधिकारी व बौध्द समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.