सिंधुदुर्ग

Devgad News | देवगडमध्ये मोकाट गायीला दुचाकीची धडक, ४० वर्षीय युवकाचा हकनाक बळी!

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड नांदगाव मार्गावर जामसंडे येथील एका खाजगी हॉस्पिटल नजीक देवगडहून जामसंडेच्या दिशेने आपल्या दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यावर गाय आडवी आल्याने दुचाकीची गाईला जोरदार धडक बसली.

या अपघातात दुचाकीस्वार मिलिंद शामराव घाडी (४०) (मूळ राहणार तळवडे) सध्या राहणार जामसंडे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे जाहीर केले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास झाला.

मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद हे देवगड मध्ये एका खाजगी वाहनावर चालक म्हणून गेली बरेच वर्ष कार्यरत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे आपले काम आटपून शुक्रवारी सायंकाळी दुचाकी क्रमांक MH - 07 -AQ - 0365 ( tvs जुपिटर) घरी जात असताना जामसंडे वडांबा येथील एका खाजगी हॉस्पिटल नजीक अचानक रस्त्यामध्ये गाय आडवी आल्याने गाईला दुचाकीची जोरदार धडक बसली.

यावेळी दुचाकी स्वार गाडीवरून बाहेर फेकले गेले. व रस्त्यावर आपटले त्यांना गंभीर अशी दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून देवगड ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले मात्र डॉक्टर यांनी तपासणी पूर्वी ते मृत झाल्याचे घोषित केले. अपघाताचे वृत्त समजतात देवगड जामसंडे मधील नागरिकांनी व मित्रपरिवाराने देवगड ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. त्याच्या पत्नी व नातेवाईकांना तळवडे येथे ही माहिती समजताच नातेवाईक देखील देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले . यावेळी पत्नीने रुग्णालयातच हंबरडा फोडला. मिलिंद यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले,आई वडील असा मोठा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT