कणकवली ः जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा बुधवार, 28 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे.
या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजप नेते खा. नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसरकर, आ. नीलेश राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.