सावंतवाडी ः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या आरोपांना राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले असून, दमानिया यांचे सर्व दावे चुकीचे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.
अंजली दमानिया यांनी काही वरिष्ठ मंत्र्यांचे खरात नामक व्यक्तीशी फोनवरून संभाषण झाल्याचा दावा केला होता. यावर स्पष्टीकरण देताना केसरकर म्हणाले की, जोपर्यंत खरात यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झाले नव्हते किंवा ते कोणत्याही प्रकरणात अडकले नव्हते, तोपर्यंत त्यांच्याशी कोणी फोनवर बोलणे हा गुन्हा ठरू शकत नाही. केवळ संभाषणाच्या आधारावर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे किंवा गैरप्रकाराचे आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे.