कुडाळ : कुडाळ शहरांमध्ये भाजी विक्रेता मूळ विजापूर मधील २८ वर्षीय शिवा कृष्णा नायक याने राहत असलेल्या भाड्याच्या खोलीमध्ये गळफास लावून जीवन संपवल्याची घटना घडली होती. मात्र या घटनेमागे नातेवाईकांकडून संशय निर्माण केला जात असून याबाबत मयत शिवा याचा भाऊ व काही नातेवाईक शनिवारी सायंकाळी उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
भाजी विक्री व्यवसाय करणारा शिवा नायक हा पत्नी व मुलांसोबत शहरातील मारुती मंदिर शेजारी असलेल्या एका चाळीत भाड्याने राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या या रहत्या घरात गळफास लावून जीवन संपवले अशी फिर्याद त्याची बहीण सीता राठोड हिने कुडाळ पोलीस ठाण्यात खबर दिली होती. ही घटना पत्नीच्याच रात्री दोनच्या सुमारास निदर्शनास आली होती दरम्यान कुडाळ शहरांमध्ये ही आत्महत्या आहे की, घातपात आहे याची उलट सुलट चर्चा सुरू आहे.
या दरम्यान मयत शिवा नायक याचा गावी राहत असलेला भाऊ तसेच काही नातेवाईक यांनी शनिवारी सायंकाळी कुडाळ पोलीस ठाणे गाठले. यावेळी बेळगाव तसेच कुडाळ शहरात त्यांचे राहत असलेले नातेवाईक, मित्र उपस्थित होते. दरम्यान याबाबत शिवा नाईक याच्या भावाचा जबाब कडाळ पोलिसांनी नोंदविला असल्याचेही चर्चा नातेवाईकांमध्ये सुरू होती. शिवाच्या मृत्यूच्या संदर्भात त्याचा भाऊ व नातेवाईकांनी जर संशय व्यक्त केला तर पोलीस आता त्या दिशेने तपास करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.