सहकारी युवतीवर अतिप्रसंग करून धमकी  File Photo
सिंधुदुर्ग

सहकारी युवतीवर अतिप्रसंग करून धमकी

Workplace assault case: कुडाळ येथील तरुणास अटक

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ शहरात एकाच आस्थापनेत कामाला असलेला प्रमोद विजय माटवकर (सध्या रा. हिंदू कॉलनी, साईकृपा बिल्डिंग कुडाळ, मूळ पोयरे-मशवीवाडी ता. देवगड) या युवकाने सहकारी तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तरुणीवरअतिप्रसंग करून याबद्दल कुणाला सांगितले तर बघ अशी धमकी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रमोद माटवकर याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान न्यायालयाने त्याला पोलिस कस्टडी दिली, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

वर्षभरापूर्वी एका नामांकित कंपनीची शाखा कुडाळात सुरू झाली आहे. या शाखेच्या आस्थापनेत 18 एप्रिल 2025 व त्यापूर्वी हा प्रकार घडला. पीडित युवतीने 2 मे रोजी याबाबत तक्रारी दिली. या नुसार पोलिसांनी संशयित युवकावर गुन्हा दाखल केला.

संशयित प्रमोद माटवकर फिर्यादीशी वारंवार जवळीक साधन्याचा प्रयत्न करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता. 18 एप्रिल रोजी रात्री 10 वा. त्याने युवतीच्या रूमवर जाऊन तिच्यावर मनात लज्जा होईल असे कृत्य केले तसेच अतिप्रसंग केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT