Life Imprisonment Pudhari
सिंधुदुर्ग

आईची हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

अशा घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील विलवडे येथील एका हृदयद्रावक घटनेत स्वतःच्या जन्मदात्या आईचा खून करणाऱ्या नराधम मुलाला न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे.

२५ ऑगस्ट २०२२ रोजी विलवडे येथे ही खळबळजनक घटना घडली होती. दीपक विष्णू दळवी (वय ४६) याला संशय होता की, त्याची आई लोकांकडे त्याच्याबद्दल खोटे-नाटे सांगते. याच संशयातून आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आईला जबर मारहाण केली. या मारहाणीत आई बेशुद्ध पडली आणि दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी दीपक दळवी याच्यावर भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी आरोपीला दोषी ठरवत जन्मठेप आणि द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली.

आरोपी दीपक विष्णू दळवी (विलवडे, सावंतवाडी) होता. अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावीपणे बाजू मांडली. अशा घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, संशयाचे भूत कशाप्रकारे नात्यांचा बळी घेते, याचे हे दाहक उदाहरण ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT