कोल्ड्रिफ कफ सिरपचा वापर थांबविण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवा  Pudhari File Photo
सिंधुदुर्ग

Coldrif Cough Syrup Ban | कोल्ड्रिफ कफ सिरपचा वापर थांबविण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवा

मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरप औषधाच्या वापरामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : कोल्ड्रिफ कफ सिरप, (बॅच नं एस.आर 13) या कफ सिरफमध्ये विषारी पदार्थ आढळल्यामुळे त्याचा वापर नागरिकांनी तत्काळ थांबवावा. जर हे औषध कुणाकडे उपलब्ध असेल, तर ते जवळच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयास त्वरीत कळवावे किंवा ईमेल: acfdasnd 2023gmail.com माध्यमातून थेट अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्राशासनाचे सहाय्यक आयुक्त (औषध) श्री. यादव यांनी केले आहे.

मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरप औषधाच्या वापरामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. Coldrif Syrup (Batch No. SR-93) Mfg. Dr. May-2025, Exp. Dt. -pril-2027, manufactured by Sresan Pharma, Sunguvarchathiram, Kancheepuram District, Tamil Nadu यांच्याद्वारे उत्पादित केलेले असून त्यामध्ये डायथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol - DEG) हा विषारी घटक मिसळलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या औषधाचा राज्यात वितरण झालेल्या साठ्याबाबत कारवाई घेण्याकरिता अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य येथील अधिकारी तामिळनाडू, औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून या उत्पादनाच्या महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहेत. राज्यातील विक्रेते, वितरक आणि रुग्णालये यांना औषधाच्या समूह क्रमांकाचासाठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तो सर्व साठा गोठवावा, अश्या सूचना सर्व औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आलेल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य याबाबत सर्व आवश्यक उपाययोजना करित आहे. जनतेने सावधानता बाळगावी आणि धोका टाळाया असे आव्हान अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT