सिंधुदुर्गनगरी ः जेल भरो आंदोलनात सहभागी पदाधिकारी व इतर.  (छाया ः संजय वालावलकर)
सिंधुदुर्ग

बुद्धिस्ट इंटरनॅशनल संघटनेचे सिंधुदुर्गनगरीत जेलभरो आंदोलन

Buddhist International protest: विविध मागण्यांसाठी केले आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

ओरोस ः देशात भयमुक्त निवडणुका घ्या, महाबोधी टेपल अ‍ॅक्ट रद्द करा, जातनिहाय जनगणना करा आदी मागण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल संघटनेने विविध घोषणा देत बुधवारी सिंधुदुर्गनगरी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ जेलभरो आंदोलन केले.

जिल्हाध्यक्ष विलास जाधव, अ‍ॅड. माया जमदाडे, राष्ट्र कार्यकारणी जिल्हाध्यक्ष विलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. भारत मुक्ती मोर्चाचे सगुण जाधव, बहुजन मुक्ती, कृष्णा जाधव, संतोष पाटणकर, मोहन जामसंडेकर, अक्षता जाधव, नामदेव कदम, भिकाजी कदम आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. माया जमदाडे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर न्याय मागण्याबाबत घोषणा दिल्या. जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निपक्षपाती निवडणुका घ्या अशा विविध मागण्यांच्या घोषणा दिल्या. केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याबाबत संसदेत अपमानास्पद वक्त्यव्य केल्याचा दावा करत त्यांच्या वक्त्यव्याचा निषेध यावेळीकरण्यात आला. दरम्यान पोलिसांनी 25 आंदोलकांना ताब्यात घेत सिंधुदुर्गनगरी पोलिस स्टेशन मध्ये नेऊन त्यांना समज देऊन सोडून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT