कणकवली ः कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून समीर नलावडे यांनी तर नगरसेवक पदासाठी भाजपच्या दहा उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दिक्षांत देशपांडे यांच्याकडे दाखल केले. उर्वरीत उमेदवारांचे अर्ज रविवारी व सोमवारी दाखल केले जाणार आहेत.
माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपनगराध्यक्ष गणेश ऊर्फ बंडू हर्णे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, आशिये सरपंच महेश गुरव, सदानंद राणे, किशोर राणे, रवींद्र ऊर्फ बाबू गायकवाड, अॅड. विराज भोसले, सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, संजना सदडेकर, महेश सावंत, राजू गवाणकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवारी नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र. 3 मधून स्वप्निल शशिकांत राणे, प्रभाग क्र. 4 मधून माधवी महेंद्रकुमार मुरकर, प्रभाग क्र. 5 मधून मेघा अजय गांगण, प्रभाग क्र. 6 मधून स्नेहा महेंद्र अंधारी, प्रभाग क्र. 7 मधून सुप्रिया समीर नलावडे, प्रभाग क्र. 8 मधून गौतम शरद खुडकर, प्रभाग क्र. 12 मधून मनस्वी मिथून ठाणेकर, प्रभाग क्र. 14 मधून सुरेंद्र सुधाकर कोदे, प्रभाग क्र. 15 मधून विश्वजित विजयराव रासम, प्रभाग क्र. 16 मधून संजय मधुकर कामतेकर या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.