वेंगुर्ले पोलिसांकडून दुचाकी चोरी रॅकेटचा पर्दापाश FiIle Photo
सिंधुदुर्ग

वेंगुर्ले पोलिसांकडून दुचाकी चोरी रॅकेटचा पर्दापाश

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले ः पुढारी वृत्तसेवा

सागरतीर्थ येथून झालेल्या दुचाकी चोरीचा वेंगुर्ले पोलिसांनी शीघ्रगतीने तपास करीत वाहनचोरीचे मोठे रॅकेट उघड केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी चार दुचाकी जप्त केल्या. यातील फ्रान्सिस झुजिन गोमस् (22, रा. कारिवडे-डगवडी, सध्या रा. सालईवाडा सावंतवाडी) याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला रविवार 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली; तर अन्य दोन संशयित अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना समज देत सोडून दिले. सागरतीर्थ समुद्र किनारा येथून बुधवारी एक दुचाकी चोरीस गेली होती. याप्रकरणी केशव दिगंबर

फटनाईक (रा.सागरतीर्थ टेंबवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान ही दुचाकी चोरून नेताना एक संशयित परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ.अमर कांडर, योगेश राऊळ, सुरेश पाटील, गजेंद्र भिसे यांनी सदर चोरट्याचा माग काढला असता दुचाकी चोरीचे रॅकेट उघडकीस आले. पोलिसांनी सागरतीर्थ येथून चोरीस गेलेल्या दुचाकीसह अन्य तीन दुचाकी सावंतवाडी-सालईवाडा येथून जप्त केल्या.

ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये दोन अल्पवयीन तरूणांचा समावेश आहे. हे दोन्ही अल्पवयीन उभादांडा परिसरातील आहेत. पोलिसांनी त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलवून घेत पालकांसमक्ष अल्पवयीन चोरट्यांना कडक भाषेत समज दिली व पालकांच्या ताब्यात दिले. फ्रान्सिस झुजिन गोमस् यांच्या सांगण्यावरून आपण दुचाकी चोरल्याचे या अल्पवयीन तरूणांनी पोलिसांना सांगितले. वेंगुर्ले पोलिसांच्या या जलद कारवाईचे कौतुक होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT