बांद्यात दहा लाखांची गोवा दारू जप्त 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : बांद्यात दहा लाखांची गोवा दारू जप्त

दोघे ताब्यात; राज्य उत्पादन शुल्क विभागाची इन्सुलीत कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बांदा : गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बांदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने गोवा बनावटीच्या अवैध मद्याविरुद्ध मोठी कारवाई केली. चौदाचाकी मालवाहू ट्रकमधील चोरकप्प्यात लपवून नेण्यात येणारे मद्य जप्त करत ट्रकसह एकूण 22 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

रविवारी मध्यरात्री 12.30 वा.च्या सुमारास गोवा ते मुंबई जाणाऱ्या ट्रकची बांदा येथील एका ढाब्यासमोर तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रक केबिनच्या मागील बाजूस खास तयार केलेल्या चोरकप्प्यात गोवा मद्याचा मोठा साठा आढळून आला.

याप्रकरणी नल्लाबोतुला जयराम (56, रा. अनंतपुरम, आंध्र प्रदेश) व पल्ले पवनकुमार रेड्डी (37, रा. अनंतपुरम, आंध्र प्रदेश) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करीत आहेत. विविध ब्रँडच्या 1652 सिलबंद बाटल्या (89 बॉक्स) अवैध मद्य जप्त करण्यात आले. याची किंमत 10 लाख 34 हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक असा 22 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT