सावंतवाडी : होडावडे- कस्तुरबावाडी येथील आशिष अशोक होडावडेकरने नुकतीच कोकण रेल्वेची लोको पायलट परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. त्याची कोकण रेल्वेत असिस्टंट लोको पायलट (सहाय्यक लोको पायलट) म्हणून नियुक्ती झाली आहे.
आशिषने आपले प्राथमिक शिक्षण होडावडे गावातील मराठी शाळेत पूर्ण केले. त्यानंतर 2016 मध्ये त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट हे अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद मानले जाते.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे घेण्यात आलेल्या लोको पायलट परीक्षेत आशिषने उत्कृष्ट यश मिळवले आणि त्याची त्वरित असिस्टंट लोको पायलट म्हणून निवड झाली. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर तो नियमित लोको पायलट म्हणून कार्यरत होईल.